- नुतन मराठा महाविद्यालयाचे आवार दहशत मुक्त करा…
- गुंड प्रवृत्ती हटाव मोहिमेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद …
- शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनीनी नोंदविला निषेध…
जळगाव – …त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे… नुतन मराठा महाविद्यालयाचे आवार दहशत मुक्त करा, अशा जोरदार घोषणा देत नुतन मराठांच्या आवारात गुंड प्रवृत्तीचे विजय भास्कर पाटील मनोज भास्कर पाटील, पियुष पाटील व त्यांच्या साथीदारांची गुंड प्रवृत्ती हटाव मोहिमेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनीनी आज दि. 13/07/2019 रोजी जाहिर निषेध नोंदविला.
याबाबत सविस्तर असे कीं, गेल्या आठवडयाभरात नुतन मराठा आवारातील गुंडगर्दी करणारे त्यागावगुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोहिम सुरु केली असता पियुष पाटील याने बिनबुडाचे व धादांत खोटे आरोप करुन नुतन मराठा महाविलयाची प्रतिमा मलिन केली आहे. त्याअनुंषागाने आज दि. 13/07/19 रोजी शेकडो विदयार्थी-विदयार्थींनी एकत्र येऊन जोरदार त्या गावगुंडाच्या विरोधात घोषणाबाजी करत विदयार्थी-विदयार्थींनी, प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांना पाठींबा असल्याचे निवेदन व विदयार्थ्यांनी विजय भास्कर पाटील व पियुष पाटील यांचे काही फोटोज देखील नुतन मराठा महाविदयालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.पुण्यप्रताप दयाराम पाटील यांना दिले आहे.
विदयार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीं, गेल्या अनेक वर्षापासून देशी दारूचे दुकान चालवीत असलेले विजय भास्कर पाटील, मनोज भास्करपाटील, पियुष पाटील हे नूतन मराठा महाविद्यालयाच्यापरिसरात गेल्या अनेक वर्षापासून प्राचार्य कर्मचारीसुरक्षारक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ले करून दहशतमाजवली आहे नुकतीच मूजे महाविद्यालय जळगाव येथेएका विद्यार्थ्याचे खून झाल्याचे दुर्देवी घटना घडली सदरघटना नूतन मराठा महाविद्यालयात या परिसरात घडू नयेम्हणून आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी व हे विजय पाटील, पियुष पाटील व त्याच्या गांव गुंडां विरोधात आमच्या सुरक्षतीतेसाठी लढा देत आहेत या लढ्यात आम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी आपल्या पाठीशी आहोत.
गेल्या दीड वर्षाच्या काळात आमच्या विद्यार्थ्यांच्या समक्ष प्राचार्य, कर्मचारी, सुरक्षारक्षकयांच्यावर गावगुंड विजय भास्कर पाटील, मनोज भास्करपाटील, पियुष पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारानी हल्ले चढविले आहे तरी पोलिस प्रशासनाने त्या गाव गुंडांवर तत्काळ कारवाई करून नूतन मराठामहाविद्यालय परिसराला दहशत मुक्त करावे. पियुष पाटील हा नूतन मराठा महाविद्यालयाचा नापासअसलेला माजी विद्यार्थी आहे. गेल्या आठवडाभरापासूनया गाव गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी महाविद्यालयपरिसरात कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवून धाडस दाखवीले आहे.
या मोहिमेला आमचा विद्यार्थी म्हणून पाठिंबाअसून आम्ही कर्मचार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेआहोत नूतन मराठा महाविद्यालयात सुरू असलेल्या यामोहिमेमुळे आपली दहशत महाविद्यालयाच्या आवारातचालणार नाही व दुकानदारी बंद पडेल या भीतीने पियुषहा महाविद्यालयाच्या आवारात आपले गुंडागर्दी कायमठेवण्यासाठी बाहेर पत्रकार परिषद घेऊन प्राचार्यांवरबेछूट आरोप करीत आहे, आरोप करुन महाविद्यालयाची बदनामी करीत आहे. वास्तविक पियुष पाटील व विजय भास्कर पाटील हे गंभिर गुन्ह्यात फरार आरोपी आहे अशा परिस्थितीत ते या मोहिमेला धमकी वजा इशारा देवून दाबण्याचा प्रर्यंक करित आहे. यात देशी दारु दुकान चालविणाऱ्या विरोधात प्रशासन मुग गिळून गप्प बसलेले आहे अशा गावगुंडांचा आम्ही विद्यार्थी-विद्यार्थिनी तीव्र निषेध नोंदवित आहे भविष्यातमहाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या जिवाचे काहीबरेवाईट झाल्यास त्यास पियुष नरेंद्र पाटील यासजबाबदार धरण्यात यावे अशा आशयाचे निवेदनविद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचेअध्यक्ष पुण्य प्रताप पाटील यांच्याकडे आजदि.13/07/2019 रोजी दिले असून सोबत पियुष पाटील याचे हातात हत्यार असलेले फोटो, ऑडीवो, व्हिडीवो पुरावे म्हणून देत आहोत. असे निवेदन विद्यार्थ्यांनी दिले असल्याचे पुण्यप्रताप पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वय कळविले आहे.