पाचोरा, – कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर नुकतीच जाहीर करण्यात आली असून कार्यकारिणी पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष – प्रल्हाद र. वाघ, तालुका कार्याध्यक्ष – मयुर दादा वाघ, तालुका उपअध्यक्ष – सचिन भाऊ कोकाटेता, लुका सचिव – सौरभ पाटील, तालुका संघटक – देविदास साळवे, तालुका सहसंघटक – प्रदिप पाटील अशी आहे.
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याची कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष प्रविण भैय्या आजबे, राज्य संघटक श्रीकांतजी राजपूत, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल पाटील, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अमोल बिडे यांच्या मार्गदर्शनाने व प्रल्हाद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आले आहे. तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून कृषी पदवीधर, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यात काम करण्यात येणार आहे.














