Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटलांचा संवाद

najarkaid by najarkaid
May 18, 2020
in जळगाव, आरोग्य
0
कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटलांचा संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,  दि. 18 – कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे 279 रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील सामान्य रुग्णालयातून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढण्यासाठी ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतूक तर केलेच त्याचबरोबर रुग्णांना लवकरच बरे होऊन बाहेर या. अशा सदिच्छाही व्यक्त केल्यात.
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हयात 78 कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव व भुसवाळ येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर त्याचठिकाणी उपचार करण्यात येत आहे. या रुगणांशी व डॉक्टरांनी आज संवाद साधताना अमळनेर येथे आतापर्यंत 105 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी आतापर्यंत 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे तर आज 30 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चांगल्याप्रकारचे व योग्य प्रकारे उपचार होत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण बरे होत आहे याबद्दल पालकमंत्र्यांनी अमळनेरसह जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टिमचे कौतूक केले. तर कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या सुविधा, तसेच त्यांचेवर होणारे उपचार, सेंटरमधील स्टाफची रुग्णांशी वागणूक आदि बाबींची विचारपूस केली. त्याचबरोबर डॉक्टर चांगल्याप्रकार उपचार करीत असल्याने आपण या महामारीतून नक्कीच बरे होऊन लवकरच घरी परताल अशा सदिच्छाही दिल्यात.
पालकमंत्र्यांची कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळेस भेट
जळगाव जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्य शासनाने प्रयोगशाळा स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असून येथे लवकरच स्वॅबचे नमुने तपासण्यास सुरुवात होणार आहे. या कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेस पालकमंत्री श्री. पाटील यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ किरण पाटील यांचेसमवेत भेट देऊन पाहणी केली. प्रायोगिक तत्वावर याठिकाणी आजपासून नमुने तपासण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ खैरे यांनी दिली तर लवकरच जिल्ह्यातील सर्व रुग्णांचे नमुने याच प्रयोगशाळेत तपासण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रसुती झालेल्या कोरोनाबाधित महिलेस पालकमंत्र्यांची साडीचोळीची भेट
येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित महिलेची दोन दिवसांपूर्वी प्रसुती झाली असून या महिलेने जुळया मुलांना जन्म दिला आहे. या दोन्ही बाळांची तब्बेत ठणठणीत आहे. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोविड रुग्णालयास भेट देऊन दिली त्यावेळी पालकमंत्र्यांनी या महिलेसाठी तीच्या नातेवाईकांकडे साडीचोळीचा आहेर देऊन आपले भावाचे कर्तव्य पार पाडले व लवकरच बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात. त्याचबरोबर येथील रुग्णांना पोषक आहारही पालकमंत्र्यांच्यावतीने वाटप करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितही बहुतांश ग्रामसेवकांची हेडकॉटरला गैरहजरी !

Next Post

होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास होणार गुन्हे दाखल

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास होणार गुन्हे दाखल

होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास होणार गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us