दहिगाव ता.यावल – येथून जवळच असलेल्या “सावखेडा” येथील 12 वर्षीय बालिकेला तिच्या घरातच सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक रोजी 16 दुपारी घडली
याबाबत मुलीचे वडील प्रल्हाद पुरुषोत्तम कोळी यांनी खबर दिली की त्यांची मुलगी विजया प्रल्हाद कोळी वय 12 राहणार सावखेडासीम ही दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात घरावरील पत्रांवर असलेल्या शेंगा काढीत असताना भिंतीवर दडलेला साप याने दंश केला तत्काळ मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्र घेऊन तिच्यावर उपचार करून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मयत झाली विजयाच्या पश्चात आई-वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे “आदर्श विद्यालय” दहिगाव येथील इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने मुलीला तिच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी गावातून होत आहे विशेष म्हणजे विजया हिला अक्षय तृतीयेच्या दिवशी तिच्याच घरात दर्शन दिले होते तेव्हापासून तो साप त्यांच्या घरात किंवा परिसरातच जात असल्याचे गावकऱ्यांना मधून बोलले जात आहे चार ते पाच फूट लांबीचा विषारी असल्याचे तिच्या वडिलांनी प्रत्यक्ष दर्शनी बघितले याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली सिकंदर तडवी व सहकारी तपास करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बातम्या
प्रामुख्याने वाचायला मिळतात