Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागरिकांनी मदत करताना स्वत:चीही काळजी घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

najarkaid by najarkaid
May 15, 2020
in जळगाव
0
तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्तीच्या प्रशासकीय मान्यतेस मुदतवाढ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 15  – जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या जिल्ह्यातून स्थलांतरित मजूर जात आहेत. या मजुरांना मोठ्या प्रमाणात नागरिक, स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. ही कौतुकाची व अभिनंदनीय बाब आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण पाहता मदतकर्ते नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 235 नागरिकांना आतापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झाली आहे, तर अठ्ठावीस जणांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी अनेक दानशूर नागरिक, स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. अशा व्यक्तींचे कार्य गौरवास्पद आहे. नागरिक, संस्था या मजुरांना पाणी, भोजन, औषधे आदींची मदत करीत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाला सहकार्य होत आहे. मात्र, असे नागरिक व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही मदत कार्य करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
सामाजिक संस्थांना पालकमंत्र्यांचे आवाहन
स्थलांतरित मजुरांसाठी अनेक दानशूर नागरिक, स्वयंसेवी संस्था पुढे आल्या असून त्या या मजूरांना जिल्ह्याच्या विविध ठिकाणी मदतकेंद्र उभारुन मदत करीत आहे की कौतूकाची बाब आहे. असे असले तरी अनेक सामाजिक संस्थांनी मदत केंद्र हे राष्ट्रीय महामार्गालगत उभारले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. तसेच या मजूरांबरोबर त्यांचे कुटूंब लहान मुले असतात ही बाबत लक्षात घेऊन मदत केंद्र उभारताना, शहरातील नागरीकांना तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. या संस्थांनी मदतकेंद्र उभारताना ते शक्यतो शहराबाहेर उभारावेत. जेणेकरुन स्थलांतरीत मजूरांना गाडीतून उतरल्यानंतर जेवण व पाण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होईल. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरीत मजूरांची गर्दी होऊन वाहतुकीसही अडथळाही निर्माण होणार नाही. त्याचबरोबर शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे, की त्यांनी घरीच राहून सुरक्षित राहावे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अशा वेळेस नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावला पाहिजे. तसेच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हावासियांनी घरीच थांबून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोरेगाव येथील एक हजार खाटांच्या ‘कोरोना काळजी केंद्रा’ची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी 

Next Post

भुसावळ जंक्शनवरून धावली गोरखपूरसाठी श्रमिक एक्स्प्रेस

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us