अमळनेर,(प्रतिनिधी)- अमळनेर ग्रामीण रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांकडून मेडिकल सर्टिफिकेट साठी नागरिकांची आर्थिक लूट होत असून नागरिकांकडून अनावश्यक शंभर रुपयेची मागणी होत असल्याचे आज समोर आले आहे.
लॉकडाऊन काळात बाहेर गावी जाण्यासाठी नागरिकांना तपासणी करून मेडिकल सर्टिफिकेट शासनाने आवश्यक केल्याने नागरिकांनी सरकारी दवाखान्यांमध्ये मेडिकल सर्टिफिकेट मिळविण्याकरिता गर्दी केली आहे मात्र या गर्दीचा फायदा काही आरोग्य कर्मचारी उचलतांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आज दिसून आले.मेडिकल सर्टिफिकेट करिता आलेल्या नागरिकांकडून दहा रुपये केस पेपर व मेडिकल सर्टिफिकेटचे 100 रुपये कर्मचारी मागणी करत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील अमळनेर अगोदरच कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असतांना काही लोभी कर्मचाऱ्यांकडून महामारीतही नागरिकांची आर्थिक लूट करण्याची घटना समोर आली आहे.
एकीकडे आरोग्य विभागाचे योद्धा डॉक्टर, परिचारिका व इतर स्टाफ कोरोना सारख्या महामारीत जीवाची पर्वा न करता काम करित आहे.तर दुसरीकडी काही लोभी अशा पद्धतीने नागरिकांची आर्थिक लूट करित आहे.यांच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा सामान्य नागरिक करित आहे.
चौकशी करून कारवाई करणार – सिव्हिल सर्जन डॉ.एन.एस. चव्हाण
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात मेडिकल सर्टिफिकेट करता काही कर्मचारी नागरिकांकडून केस पेपर व्यतिरिक्त शंभर रुपये अतिरिक्त घेत असल्या बाबत विचारणा केली असता सिव्हिल सर्जन डॉ.एन. एस. चव्हाण म्हणाले की असल्या प्रकाराची माहिती घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.