जळगाव ;- येथील सन ऑफ सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५६४ वी जंयती लॉक डाऊनचे नियम पाळून रिपब्लीकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले )जळगांव जिल्हाध्यक्ष आयटी सेल मिलींद तायडे यांच्या हरी विट्ठल नगर येथे साजरी करण्यात आली . सर्व प्रथम बुद्धाच्या मूर्तीची पूजा संस्थेचे अध्यक्ष मिलींद तायडे यांनी मेणबत्त्या लावून केली. यानंतर बुद्धांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब मानव जातीने करावा असे आज जगाला युद्धाची नव्हें तर बुद्धांची गरज असल्याचे सांगत श्री.तायडे यांनी यावेळी आपले विचार मांडले . यावेळी उपाध्यक्ष युवराज सोनवणे,सचिव मधूमला तायडे,युवा जिल्हा उपाध्यक्ष शंकर भोसले, यांच्या उपस्थितीत खिर दान करण्यात आली . यावेळी रमेश पाटील, सदस्या प्रिया केदार,शोभा पातुडे,नुतन केदारी,रोहिणी वाघोदकर, सरला पाटील,मैना निकम,तुषार तायडे,सोपान पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सुयोग पातुडे आदी उपस्थित होते