जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी वॉटर सप्लाय पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क मेलेले पक्षी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाण्यामध्ये मेलेल्या पक्षांचे पिसे व कुजलेल्या पक्ष्यांच्या मासाचे तुकडे नळातून पाणी भरताना निघताना आढळले. यामुळे पाण्यातून मोठी दुर्गंधी येत होती. सदरील समस्या हि गेल्या दोन दिवसापासून सतत चालू आहे. गावातील ग्रामपंचायत आरोग्याच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार येथील सरपंच तसेच ग्रामसेवक करीत असून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन गावकर्यांची कोणतीही दखल घेत नसून गावातील समस्या कुणाकडे मांडाव्यात असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.