जळगाव, (प्रतिनिधी) दि. 7 – जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 41 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून *पाच* व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एक 60 वर्षीय पुरूष, कांचननगर, जळगाव येथील 35 वर्षीय महिला, तर पाचोरा येथील 44 व 53 वर्षीय पुरूष व 20 वर्षीय महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश आहे.













