मुक्ताईनगर,(प्रमोद पोहेकर)- तालुक्यातील चारठाणा गावातील 20 मजूर लॉकडाऊन मुळे बंगाल येथील झाकपूर जिल्ह्यामध्ये अडकल्याने आपल्या गावी येण्यासाठी मदत मागत आहेत.
अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी बंगाल प्रशासनाचे तहसीलदार बस भाडे करिता पैसे मागत आहेत तर याबाबत मुक्ताईनगर तहसीलदार यांच्याशी पत्रकार प्रमोद पोहेकर यांनी मदत करण्याचे सांगितले असता मजूर दुसऱ्या राज्यात अडकलेले असल्याने त्यांना आणण्यासाठी प्रशासन स्तरावरून मी काही करू शकत नाही हे काम तिथल्या राज्याचे असे सांगितलं. अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी येण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागेल की प्रशासन या मजुरांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी पुढे येईल हे समजेलच.