पाचोरा, (प्रतिनिधी) कोरोना व्हायरस उपाययोजना करण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निधीतुन आज पाचोरा प्रांत कार्यालय येथे ग्रामीण रुग्णालय पाचोरा व भडगाव साठी साहित्य उपलब्ध करून दिले.
आमदार किशोर आप्पा पाटील , उप विभागीय प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे , सिव्हिल सर्जन एन. एस. चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ ,डॉ. अमित साळुंखे ,डॉ.शेखर पाटील,डॉ. राहुल पटवारी ,डॉ.जाधव,डॉ. भुषण मगर,डॉ.अशोक माळी,डॉ.मोरे ,आमदार स्विय सहाय्यक राजेश पाटील ,किशोर बारावकर यावेळी उपस्थित होते.