चाळीसगाव – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई कलंत्री प्राथमिक विद्यालय व श्रीमती सरस्वतीबाई आवटे प्री प्रायमरी स्कूल चाळीसगाव यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे वृक्षदिंडी न्यायालय ते विठ्ठल मंदिर आयोजित करण्यात आली. पाणी वाचवा पाणी जिरवा हा विषय घेऊन रूफ वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले.
वृक्षदिंडी या वृक्षदिंडीचे चाळीसगाव न्यायालयात न्यायाधीशांच्या हस्ते पूजन करण्यात आले . दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ल.मु. पाटील यांनी पालखीला खांदा देऊन वृक्षदिंडी ची सुरुवात केली . यावेळी सहदिवाणी न्यायाधीश जी. व्ही. गांधी सहदिवाणी न्यायाधीश भागवत ,न्यायमूर्ती अपूर्वा भसारकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल, डॉ. सुनील राजपूत, डॉ. विनोद कोतकर, जेष्ठ संचालक क.मा. राजपूत, मिलिंद देशमुख, चाळीसगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष पुष्कर कुलकर्णी, एडवोकेट राहुल पाटील, एडवोकेट रणजीत पाटी,ल श्री विजय पाटील , एडवोकेट राहुल जाधव ,एडवोकेट सुभाष पवा,र शाळेचे या रुक्ष दिंडी साठी शाळेचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत यांनी परिश्रम घेतले व मुख्याध्यापक दायमा सर यांनी आभार मानले.