पाचोरा – येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नूतन वर्ष २0२0 साठी विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन दि. 31 रोजी दुपारी १ वाजता डॉ. भूषण मगर-पाटील, डॉ. सागर गरुड, डॉ. एम.स्वामी, डॉ. संदीप इंगळे व हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबिका घोष यांच्या हस्ते करण्यात आले.
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य काउंटर समोरील लॉबीत स्थापित श्री गणपतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले व त्यानंतर विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला डॉ. अनुजा देशमुख, डॉ. कंचन साखरकर, डॉ. प्रीती मगर, डॉ. प्रविण देशमुख, डॉ. मुकेश राठोड, डॉ.अतुल सोनार, किरण सूर्यवंशी व संदीप चौधरी तसेच हॉस्पिटलचे अन्य व्यवस्थापकीय अधिकारी सहकारी डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.शितल अकॅडमीचे संचालक रोहन पाटील यांनी सूत्रसंचालन केले, आशीर्वाद कॉम्प्युटर चे संचालक अतुल शिरसमणे यांनी आभार मानले