पाचोरा – आमदार किशोर आप्पा पाटील तथा कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी होऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील 20 रुग्णांची निवड होऊन त्यांना दिनांक 2.01.2020 गुरुवार रोजी कांताई नेत्रालय जळगाव येथे ऑपरेशन साठी मा.श्री रावसाहेब पाटील, गणेश पाटील,चंद्रकांत धनवडे, पप्पूदादा राजपूत, बाप्पू हटकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन रवाना केले.
पाचोरा येथील शिवतीर्थ मध्यवर्ती कार्यालय येथे दिनांक 2.1.2020 गुरूवार रोजी पाचोरा भडगाव तालुक्यातील 60 मोतीबिंदू ग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यातून ऑपरेशन साठी पात्र 20 रुग्णांची निवड करण्यात आली. तपासणीसाठी कांताई नेत्रालय येथील तज्ञ डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेवा दिली मोतीबिंदू तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची शिवसेना कार्यालयातील नाना वाघ,दीपक पाटील, वैभव राजपूत,नितीन पाटील, विजय भोई यांनी शिबिर यशस्वी ते साठी परिश्रम घेतले पुढील महिन्यातील दोन तारखेला पाचोरा भडगाव तालुक्यातील मोतीबिंदु ग्रस्त गरजू गोरगरीब मायबाप जनतेने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन पाचोरा भडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करीत आहोत.