पाचोरा – पाचोरा तालुका वकील संघाच्या सन 2020 करीता नुकतीच नुतन कार्यकारीणीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदी अॅड.प्रविण बी.पाटील, उपाध्यक्षपदी अॅड. अरुण एल.भोई, सचिवपदी अॅड.कैलास एम.सोनवणे यांची निवड करण्यात आली. तसेच यात कार्यकारणी सदस्य म्हणून अॅड. एम.बी. मराठा, अॅड.एस.पी.पाटील, अॅड.डी.आर.पाटील,अॅड.एस.ए.सैंदाणे, अॅड.मनिषा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.डी.आर.पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी पाचोरा वकील संघाचे सर्व सिनिअर,ज्युनिअर वकील सदस्य उपस्थित होते.