मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी अनेकदा शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून सडकून टीका झाली होती.