बोदवड – येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवडचा बास्केटबॉल खेळाडू हर्षल भदाणे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बास्केटबॉल संघात क्रीडा महोत्सव २०१९ साठी निवड झाली आहे.त्यांचे सराव शिबीर दि.२० डिसेंबर २०१९ पासून सुरु होत असून सदर स्पर्धा २४ डिसेंबर २०१९ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर येथे होणार आहे.हर्षल भदाणे यांना डॉ.किशोर पाठक यांचे मार्गदर्शन लाभले,प्राचार्य अरविंद चौधरी उपप्राचार्य प्रा.देवसिंग पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री.मिठुलालजी अग्रवाल,उपाध्यक्ष अजयजी जैन, सचिव विकासजी कोटेचा व संचालक मंडळाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या.