पाचोरा – नुकत्याच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या भारतातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांची विभागीय सभा जळगाव येथे संपन्न झाली. त्यात सन – २०१९ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील विविध एम. एस. सी. आय. टी. च्या केंद्रांना बिझनेस डेव्हलपमेंट वर्कशॉप अंतर्गत मार्केटिंग या विषयात मार्गदर्शन केल्याबद्दल एम.के.सी.एल.चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते आशिर्वाद काॅम्प्युटरचे संचालक अतुल शिरसमनी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र समन्वयक तथा जळगाव जिल्हा एम.के.सी.एल.चे समन्वयक संतोष बिरारी व एम.के.सी.एल.चे नंदुरबार जिल्हा समन्वयक जयस्वाल हे उपस्थित होते. याप्रसंगी विवेक सावंत यांनी सन – २०२० मध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. व त्यासोबतच आशिर्वाद काॅम्प्युटर इंन्स्टीट्युटला भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. आशिर्वाद काॅम्प्युटर इंन्स्टीट्युटला मिळालेल्या या अतुलनिय यशाबद्दल आशिर्वाद काॅम्प्युटर्सचे संचालक अतुल शिरसमनी, अजिंक्य कासार सह त्यांचे टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.