वाघारी, ता.जामनेर – तालुक्यातील वाघारी गावात बसस्थानक आहे मात्र त्यावर ‘शेड’ चा पत्ताचं नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होतं आहे दरम्यान आता पावसाळा सुरु झाला असून ‘बस’ ची वाट पाहण्यासाठी शाळकरी मुलांना व इतरही प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागतं त्यामुळे बस आल्यावर प्रवाशांची धावपळ पाहायला मिळते तरी बसस्थानकावर ‘शेड’ प्रवाशांना सुखाचा प्रवास करण्यास मदत होईल.
महाराष्ट्र सरकारने महिलांना एसटी तिकिटामध्ये ५०% सुट, तसेच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, शाळेत जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनीची संख्येत पूर्वी पेक्षा नक्कीच वाढ झाली आहे.ग्रामीण भागात आधीचं बसेसची संख्या कमी असते अशात बसस्थानकावर गर्दी मोठी असल्याने या ठिकाणी ‘शेड’ असणं आवश्यक आहे.
वाघारी बस स्थानकावर व आजूबाजूला अतिक्रमण असल्यामुळे मोयखेडा, वडगाव, टीघरे,सारगाव या गावातील प्रवासी व शाळकरी मुलांना बस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर उभे राहावे लागत आहे तसेच बस आल्यानंतर प्रवाशांची धावपळ होत असते.तरी या ठिकाणी त्वरित प्रवासी निवारा शेड बसवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून व परिसरातील पालक वर्गाकडून होत आहे.