जळगाव,(प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मंत्रीमंडळात काही नवीन चेहरे दिसतील तर काही मंत्र्यांचे खाते बदल होतं काही मंत्र्यांचं प्रमोशन होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं असतांना भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन हे राज्याच्या मंत्रिमंडळातील क्रियाशील मंत्री असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात गिरीश महाजन महत्वाची भूमिका बजावतांना दिसतात त्यांना भाजपाचे संकटमोचकही म्हणून राज्यात ओळखलं जातं त्यामुळं काही दिवसावर होऊ घातलेल्या राज्यमंत्रीमंडळाचा विस्तारवेळी महाजणांचे ‘प्रमोशन’ होऊन गृहमंत्री म्हणून वर्णी लागू शकते. दरम्यान याबाबत शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
दरम्यान मुक्ताईनगर येथे संत मुक्ताईची पालखी मंगळवारी दि.१८ पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीला रवाना झाली. मुक्ताईच्या पालखी सोहळ्यावेळी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुक्ताई चरणी नामदार गिरीश महाजन लवकर गृहमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना केली व गिरीश महाजन गृहमंत्री व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करून महाजन राज्याचे नवे गृहमंत्री असू शकतात असे संकेत दिले आहे.
टाळ मृदुंगाच्या गजरात संत मुक्ताईची पालखी पंढरपुरला रवाना झाली. यावेळी संत मुक्ताईची आरती नामदार गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, मंदाताई खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर तल्लीन होत विठ्ठल नामाचा नामघोष केला. त्यानंतर त्यांनी मुक्ताईंच्या पालखीचे सारथ्य केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे, याबाबत लवकरच पक्षाचे दिल्लीतील नेते निर्णय घेतील, काही महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणुक पाहता देवेंद्र फडणवीस स्वतःला पक्ष संघटनेत व विधानसभेच्या तयारीसाठी स्वतःला झोकून देतील असं दिसतं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारीतून बाहेर पाडता आले नसले तरी त्यांच्याकडे असलेली काही महत्वाची खाती ते आपल्या पक्षाच्या काही कार्यशील मंत्र्याकडे सोपावू शकतात.दरम्यान गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं गृह खातं हे गिरीश महाजन यांना मिळू शकतं अशी शक्यता वर्तविली जात आहे.
गृहमंत्री होणार का? गिरीश महाजन काय म्हणाले
शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संतमुक्ताई कडे गिरीश महाजन गृहमंत्री व्हावे यासाठी प्रार्थना केली असून गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत महाजणांनी गृहमंत्री व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान याबाबत कार्यक्रम आटोपल्या नंतर गिरीश महाजन यांना पत्रकारांनी आपण संत मुक्ताईच्या कृपेने गृहमंत्री होणार का? असं विचारण्यात आलं त्यावेळी महाजन यांनी हात जोडत ‘संत मुक्ताई की जय ‘ एवढचं म्हणत उत्तर देणं टाळलं. यापूर्वीही गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतांना त्यांनी स्वतः मीडियाला या चर्चामध्ये तथ्य नसल्याचे सांगितलं होतं.