जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासन जळगाव व सांस्कृतिक कार्य संचालनायातर्फे दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ ते ३ मार्च २०२४ दरम्यान बुधवार ते रविवार पोलीस कवायत मैदानावर महोत्सव आयोजित करण्यात आला असून महासंस्कृती महोत्सवात ‘महाराष्ट्र गीत’ वाजवले नसल्याने उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महासंस्कृती महोत्सवात ‘महाराष्ट्र गीत’ वाजवले नसल्याने मंत्री सुधीर मुनगंटीवार,खासदार उन्मेष पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उबाठा शिवसेना पक्षाचे
उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मनीषा पाटील,विकास पाटील,विजय बांदल,विशाल सोनवणे,राहुल बेलदार यांनी दिला आहे.
स्थानिक कलावंताना डावलले
जळगाव येथे सुरु असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात खान्देशातील स्थानिक कलावतांना डावलून काय साध्य करायचे आहे याचे उत्तर उत्तर देखील उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने विचारण्यात येतं आहे.
दरम्यान शासनाने कोटी रुपये खर्च करून महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले मात्र नागरिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.कार्यक्रमाला अपेक्षित प्रेक्षक न लाभल्याने सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा होतांना दिसते.