जळगाव,(प्रतिनिधी)- श्री विश्वकर्मा जयंती निमीत्ताने विश्वकर्मा युवा फाउंडेशनच्या वतीने दि. २२/०२/२०२४ गुरुवार रोजी भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुध्दा करण्यात आले आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे
सर्वप्रथम दिनांक २२/०२/२०२४ गुरुवार रोजी सकाळी ९.०० ते १.०० या कालावधीत श्री विश्वकर्मा यांचे मिरवणूकीचे आयोजन करण्यात आलेले असून मिरवणूक रथाचे पूजन व मिरवणूकीस सुरुवात ही जळगाव येथील चिमकुले राम मंदिर येथून सकाळी ९.०० वा. होणार आहे. तर प्रभु विश्वकर्मा आरती दुपारी १२.०० वा. होणार असून त्यानंतर अतिथी व समाजातील मान्यवरांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे व शेवटी दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन ठेवलेले आहे.
तसेच महत्वाचे म्हणजे यावेळी शासनाच्या पी. एम. विश्वकर्मा योजनेची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे व रक्तदान शिबीराचे आणि आरोग्य तपासणी शिबीराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.
वरील सर्व कार्यक्रम हे हतनूर वसाहत हॉल, महाबळ जळगाव याठिकाणी ठेवलेले आहेत. तरी सर्व समाज बांधवांना सदरील मिरवणूकीस व सर्व कार्यक्रमांस जातीने हजर रहावे असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आलेले आहे.