जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती विभागाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी धनश्री संजय बत्तीसे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते मुंबईत देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरणा नुसार पक्ष वाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या हिताची कामं करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वचं स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे. यावेळी युवती विभागाच्या इतरही नियुक्त्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.