देशात बलात्कार, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाचं एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून मोबाईल मध्ये अश्लील व्हिडीओ पाहून झाल्यावर भावानेच आपल्या शेजारी झोपलेल्या बहिणीवर बलात्कार करत नात्याला काळीमा फासली आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
उत्तर प्रदेश राज्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे,मागील आठवड्यात शनिवारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ पाहत होता. यावेळी त्याची बहीण शेजारीच झोपली होती. घरी ते दोघे एकटेच होते.याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण बहीण सर्वांना याबद्दल सांगेल या भीतीने त्याने नंतर तिची गळा दाबून हत्या केली आणि घऱातून पळ काढला.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगाने शोध सुरु केला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन जप्त केला आहे. कासागंजच्या पोलिस अधीक्षक (एसपी) अर्पना रजत कौशिक यांनी सांगितल्यानुसार, तपासादरम्यान पोलिसांना मोबाईल मध्ये अनेक अश्लील क्लिप सापडल्या आहेत.