जळगाव,(प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील पहूर येथे बंजारा समाजाचे विविध मागण्यांसाठी आज ६ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात यावेळी आंदोलन दरम्यान वाहनेही फोडली यामुळे आंदोलन चिघडल्याचे पाहायला मिळाले.आंदोलनामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
इतर समाजासारखे आमचे देखील सर्वेक्षण व्हावे, बंजारा समाजाची मागणीभटक्या विमुक्त जाती (अ) वर्गात अवैध घुसखोरी सुरू असून विभक्त जाती प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थींवर कार्यवाही करावी यासह अन्य मागण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर येथे बंजारा समाजासह विमुक्त जातीतील अन्य समाजातर्फे गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला