अमरावती– आधी ओळख वाढवली, नंतर तासंतास फोन वर बोलायचे याचा फायदा उचलत एकाने महिलेला शरीर संबंध ठेवण्यास आग्रह धरल्याने सदर महिलेने त्यास नकार दिल्याने महिलेची हत्या करून विहरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकलासपूर परिसरात घडली, सदर महिलेच्या अर्धनग्न अवस्थेत शेत शिवारातील एका विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.
महिलेने शरीर संबंधास नकार दिल्याने तिच्या डोक्यात दगड घालून महिलेची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली संशयित आरोपी आकाश मंदूकर याने पोलीस तपासात दिली.पोलिसांनी या प्रकरणी आकाश मंदूरकर याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा उलगडा करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
संशयित आरोपीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी तीन महिन्यांपासून मृत महिलेसोबत फोनवर संपर्कात होता. तो दररोज तिच्यासोबत फोनवर, व्हॉटसअप, व्हिडीओ कॉलवर बोलत होता. २५ जानेवारी रोजी ती महिला नांदगांव खंडेश्वर येथे आली होती. त्यादिवशी दोघेही संध्याकाळी आकाशच्या एकलासपूर शिवारातील शेतात भेटले होते.
आकाशने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्याकडे आग्रह धरला. त्यामुळे दोघांत वाद झाला. तिने ही बाब आकाशच्या घरी सांगण्याची व गावात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे आकाशने शेतातील दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. यातच तिचा मृत्यू झाला. ती मरण पावल्याची खात्री झाल्यावर आकाशने तिच्या अंगावरील साडी, पेटीकोट, स्टोल व चपला काढल्या. तिचा मृतदेह उचलून तो चंदू गावंडे यांच्या शेतातील विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने दिली.