जळगाव : राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपुर्ण राज्यातील शासकिय व निमशासकिय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता “राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम” राबविण्यात येणार आहे. शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलीची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जन्मजात आजार व इतर आजारांवर विनामुल्य उपचार, संदर्भसेवा व विनामुल्य शस्त्रक्रिया मोहिम राबविण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार हे या कार्यक्रमाचे दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन करणार आहेत. तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदीरा गांधी मॉडेल स्कुल, औंध, पुणे येथे दि.०१ मार्च २०२५ ला सकाळी ८.३० वा. दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाणे जळगाव जिल्हयातील एकुण १५ तालुक्यात दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असुन उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावर उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन अभिनव विद्यालय, प्रताप नगर, जळगांव येथे सकाळी ८.३० वाजता करण्यात येणार आहे.