जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदलीचे आदेश आज दिनांक 31 जानेवारी रोजी प्राप्त झाले असून त्यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधीक्षक पदी बृहन्मुंबई येथे पोलीस उपयुक्त असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहे.
चाळीसगाव अपर अधीक्षकपदी कविता नेरकर
चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांचीही बदली झाली आहे.