जळगाव,(प्रतिनिधी): चोपडा शहरातील शंभर कोटींच्या विकासकामांचे उद्घाटनासह ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.४ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येतं असल्याची माहिती शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी दिली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडे या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.(eknath shinde latest today news)
चोपडा शहरात अमृतअंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामाचे उद्घाटन होणार आहे. ममुराबाद येथे ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी विमानतळ परिसरात नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित सभेच्या जागेची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याची माहिती आहे.(eknath shinde latest today news)