जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजयदादा गरुड भाजपामध्ये दाखल होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दरम्यान आज दिनांक ३० जानेवारी रोजीचा मुहूर्त साधत संजय गरुड यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जामनेर तालुकाध्यक्ष विलाससिंग राजपूत यांच्यासह अठराशे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपात प्रवेश केला असून यामुळे जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरुड यांचा भाजपात प्रवेश करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन…
संजय गरुड यांच्या प्रवेशाला सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंत्री गिरीष महाजन
जाहीर प्रवेश सोहळ्याला मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवर नेते मंडळी…
प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्या समवेत विलाससिंग राजपूत
मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते सत्कार स्वीकारतांना विलाससिंग राजपूत
दरम्यान आज संजय गरुड यांच्या सोबत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अनेक माजी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, सदस्य अशा एकूण अठराशे जणांनी प्रवेश केल्याची माहिती विलाससिंह राजपूत यांनी ‘नजरकैद‘ शी बोलतांना दिली असून या यादीत अजून महत्वाच्या काही पदाधिकारी, जि.प सदस्य यांचे नावे समाविष्ट करायचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजीनामा
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या गटबाजी कंटाळून संजय गरुड यांनी २५ जानेवारी रोजीचे पक्षाच्या प्राथमिक सदस्य व पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा पासूनच संजय गरुड हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु होत्या आज अखेर संजय गरुड यांनी भाजपात प्रवेश केला आहे.