जळगाव,(प्रतिनिधी)- सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि . (RCF ) यांच्याद्वारे प्रधानमंत्री जन उर्वरक परियोजना अंतर्गत युरिया गोल्ड ( सल्फर कोटेड यूरिया) चे भारतातील पहिल्या रॅकचे जल्लोषपूर्ण स्वागत झाले . यावेळी कृषी विकास अधिकारी श्री सूरज जगताप, मोहीम अधिकारी श्री विजय पवार, MAIDC चे विभागिय व्यवस्थापक श्री इंगळे, RCF जळगाव जिल्हा प्रभारी श्री जाकीर शेख, अधिकृत विक्रेते , उप – विक्रेते , प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्क्रमाचे उदघाटन कृषी विकास अधिकारी यांच्या हस्ते झाले .
सदर युरिया गोल्ड मध्ये १७% सल्फर व ३७ % नायट्रोजेन आहे . ज्यामुळे मातीतील सल्फर ची कमतरता भरून काढली जाते . याची विशेषता म्हणजे कमी मात्रात जास्त परिणाम, मातीतील पोषक तत्वांची सुधारणा , उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ, शेतकरी बंधूंना जास्त आर्थिक लाभ, नायट्रोजन सोबत सल्फर प्रकार उपलब्ध ( नायट्रोजन ३७% आणि सल्फर १७%). प्रजासत्ताक दिनाच्या पार्शवभूमीवर जळगाव आणि परिसरातील शेतकरी बांधवांकरिता हि एक सुवर्ण संधी आहे .सदर युरिया गोल्ड चा लाभ घेण्याचे आवाहन RCF जळगाव चे प्रमुख जाकीर शेख यांनी केले आहे . जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता युरिया गोल्ड ची मुबलक उपलब्धता आणि सुवर्ण लाभ घेता येईल .