जळगाव : महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
त्यानुसार अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. लक्ष्यात असू द्या मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 आहे.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – MMC नोंदणी
वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत.
वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000/- रुपये. पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : प्रशासकीय इमारत मजला क्रमांक २ मा. उपायुक्त सो, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव.