संगीत विश्वातून एक वाईट बातमी समोर येतेय. शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन झाले आहे. गायिका, संगीत रचनाकार, लेखिका व प्राध्यापिका म्हणून डॉ. प्रभा अत्रे याचं नाव लौकिक होतं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज पहाटेच्या वेळी तीन साडेतीनच्या सुमारास झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे विजय करंदीकर, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांच्याकडून घेतले होते. त्यांना पद्मश्री (1990) पद्मभूषण (2002) आणि संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे.