राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सभापती नार्वेकर यांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे 3 आठवड्यांचा वेळ मागितला होता, त्यानंतर न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची मुदत दिलीय.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले की, आमदारांच्या अपात्रतेचे आदेश देण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ द्यावा. त्यावर न्यायालयाने सांगितले की, अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.