जळगाव,(प्रतिनिधी)- आमच्या ग्राहकांना वेळेवर व सर्वोत्तम सेवा पुरविणे याला सर्व गॅस वितरकांचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. कोणत्याही व्यक्तीची किंवा कुटुंबाची अडचण होऊ नये यासाठी गॅस सिलेंडर वेळेवर पोहोचवण्यावर आमचा भर असतो. आणि याबाबतीत आमचे ग्राहकही नेहमीच समाधानी राहिले आहेत.
मात्र सध्या सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपामुळे आम्हाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आहे. गॅस सिलेंडर पोहोचवण्यास विलंब होतो आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.
वाहतूकदारांच्या संपावर तोडगा निघून जेव्हा ही पुरवठा साखळी सुरळीत होईल तेव्हा गॅस सिलेंडर वेळेवर पोहोचवण्यात गॅस वितरकांना कोणतीही अडचण येणार नाही. तोपर्यंत ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन खान्देश एलपीजी डीलर्स एसोसिएशन चे अध्यक्ष श्री दिलीप चौबे यांच्या वतीने करण्यात आले आहे