Girish Mahajan : येत्या १५ ते २० दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधचिन्ह, बोधवाक्याच्या अनावरणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडते. निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या १५ ते २० दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील,” असेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे येत्या काळात आणखी कुठला पक्ष फुटणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.