जळगाव,(प्रतिनिधी)- (loksabha election 2024) २०२४ ची लोकसभा निवडणूक देशाच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणार आहे.राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत टक्कर होणार आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. देशात लवकरच लोकसभा निवडणुका होतील त्या आधीच राजकीय वातावरण तापायला लागले आहे. नेते मंडळी एकमेकांना आव्हान देत आपआपल्या पक्षाची धुरा सांभाळताना दिसत आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी दि.६ रोजी त्यांच्या निवास्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपा नेते गिरीश महाजन (Girish mahajan today news) यांनी रावेर लोकसभा (raver loksabha) निवडणूक लढवून दाखवावीच असे आव्हान केलं आहे.
गिरीश महाजन यांची इडी कडे तक्रार पण चौकशी नाही
जामनेरच्या एका व्यापाऱ्याने गिरीश महाजन यांची इडीकडे तक्रार केली आहे त्याबाबत त्या व्यापाऱ्याने मला सांगितलं आहे त्यांची वैध व अवैध संपत्तीची माहिती त्यात देण्यात आली आहे, मात्र त्यांची साधी चौकशी होत नसल्याचे खडसे यांनी सांगितले.त्याबाबत मी त्या व्यापाऱ्याकडून कागदपत्रे घेऊन पाठपुरावा करेन,एका सेवा निवृत्त शिक्षकाचे सुपुत्र असतांना पण गिरीष महाजन यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली हे जाहीर करायला हवे असेही खडसे यांनी यावेळी सांगितले.
गिरीश महाजनांच्या हातात काहिचं नाही
जसं माझ्या पक्षाने व माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी रावेर लोकसभा निवडणूकिसाठी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यास व माझ्या तब्बेतीने साथ दिल्यास मी रावेर लोकसभा निवडणूक लढणार आहे असं जाहीर पणे सांगत आहे तर दुसरीकडे गिरीश महाजनांच्या हातात आता काहीच राहिलेले नाही.त्यांनी रावेर लोकसभा निवडणूक लढवील असेही सांगू शकत नाही.रक्षा खडसे किंवा गिरीश महाजन यांच्या तिकिटाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होईल.त्यांच्या हातात काहिचं नाही असं खडसे म्हणाले.
घरवापसीवर खडसे म्हणाले….
लोकसभा लक्ष ठेवत भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर भाजपा पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षात कुणाला घ्यायचे, कुणाला नाही, पक्षातून बाहेर पडलेल्या कोणत्या नेत्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही याबाबत संपूर्ण अधिकार विनोद तावडे यांना आहेत दरम्यान विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यातील सौख्य सर्वानाचं माहिती असल्याने एकनाथराव खडसे यांची घरवापसी होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर पत्रकारांनी खडसेनां विचारलं असता खडसे म्हणाले याबाबत माझ्याशी कुठलीही चर्चा नाही, आता खूप उशीर झाला आहे भाजपने माझा जो छळ केला आहे,आणि अजूनही करत आहे. विनाकारणच्या चौकशा मागे लावल्या, यंत्रणाचा गैरवापर होतं आहे त्यामुळे मी कदापीही भाजपा पुन्हा जाणार नाही, असे खडसे म्हणाले.
भाजपाकडे वाशिंग मशीन
विरोधी पक्षांतील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई केली जात नाही. भाजपकडे ‘वॉशिंग मशीन’ असल्याची टीका खडसेनीं यावेळी केली.
रावेरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी प्रस्ताव दिला
सुटली तर आपणच उमेदवार असू, मंत्री गिरीश महाजन यांनी पळ न काढता लोकसभा निवडणूक लढवावीच, असे खुले आव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे. रावेर मतदारसंघात काँग्रेसचा ३० वर्षांपासून मोठ्या फरकाने पराभव होत आला आहे, म्हणून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. येत्या आठ दिवसात जागा वाटप होतील तेव्हा सारेच स्पष्ट होईल, असेही खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांनी शनिवारी
डॉ. केतकी पाटील भाजपकडून लढणार?
डॉ.उल्हास पाटील काँग्रेसचे आहेत, त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.काही दिवसापूर्वी केतकीताईंनी भाजपा कडून निवडणूक लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती भाजप त्यांच्या संपर्कात किंवा ते भाजपच्या संपर्कात असावेत.पण केतकीताईनं सांगाव की मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आणि तेही काँग्रेसच्याच तिकिटावर… आणि ही जागा काँग्रेसला सुटल्यास डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील किंवा अन्य कोणी उमेदवार असले तर त्यांना निवडून आणू असेही ते यावेळी बोलत होते.
जळगावच्या जागेसाठी प्रभावशाली व्यक्तीची इच्छा
जळगावची जागाही आम्ही मागितली आहे. या मतदारसंघातील एक प्रभावशाली व्यक्ती आहे, जी राजकारणात नाही त्यांनी येथून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आठ महिन्यांपूर्वी शरद पवार व ही व्यक्ती विमानात सोबत होते, तेथेच ही चर्चा झाल्याचे खडसे यांनी सांगितले.Maharashtra BreakinNews Today : (Maharashtra LIVE News) (Mumbai-Pune News) LIVE updets (Political News)