शिर्डी,(प्रतिनिधी)- राम (RAM) हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता… १४ वर्ष वनवास भोगला होता मग ते राम (RAM) शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह भाजपावर सडकून टीका केली आहे.(Jitendra Awhad Today News) शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
शिकार करून खाणारा राम…
शिर्डी येथील शिबिरात बोलतांना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे.१४ वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले.
ओबीसींच्या मुद्यावरून आव्हाड यांनी भाजपवर टीका केली.तर अजितदादा पवार यांनी शरद पवारांशी केलेल्या गद्दारीवरूनही अजितदादा गटाचा समाचार घेतला. पुढे आपल्या भाषणात ते म्हणतात की,शाहू महाराजांची हत्या करण्याचा कुणी कट रचला होता? बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कूणी केला हे पाहिलं हवं. शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दिले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही ! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत.
– डाॅ.जितेंद्र आव्हाड