साहित्य
१ सिमला मिरची, १ कांदा, १ टोमॅटो, १ काकडी,१ हिरवी मिरची, कोथिंबीर, अर्धा कप रवा,अर्धा कप पोहे, दही,चिली फ्लेक्स, मीठ,चीज,बटर
कृती
सर्वप्रथम, कांदा, टोमॅटो, बीट [सोललेले], सिमला मिरची, काकडी, गाजर आणि एक हिरवी मिरची अशा या सर्व भाज्या अगदी बारीक चिरून घ्या. एका बाऊलमध्ये रवा आणि भिजवलेले पोहे घेऊन, त्यामध्ये थोडे दही घालून एक घट्ट मिश्रण बनवून घ्या. तुम्हाला दही नको असल्यास त्याऐवजी पाण्याचा वापर करू शकता.
तयार मिश्रणात बारीक चिरलेल्या भाज्या, चीज, मीठ आणि चिली फ्लेस्क घालून घेऊन पुन्हा एकदा सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्यावे.नंतर गॅसवर सँडविच मेकर ठेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना बटर लावून घ्या आणि सँडविचचे तयार केलेले मिश्रण त्यामध्ये घालून ८ ते १० मिनिटांसाठी शिजवून घ्या. तयार आहे तुमचे बिना ब्रेडचे पौष्टिक व्हेज सँडविच.