जळगाव : महावितरणच्या गो-ग्रीन योजनेंतर्गत वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडत जळगाव मंडळातील १२ हजार २३९ ग्राहकांनी लाखो रुपयांची वार्षिक बचत सुरू केली आहे. या सेवेतून महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दर महिन्याला द्यावे लागणारे लाईट बिल तयार करणे, कागदाचा खर्च, बिल वाटप यावरील खर्च कमी होत आहे.
काय आहे गो ग्रीन योजना?
वीज बिलावरील जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी https://pro.maha discom.in/Go- Green/gogreen.js p लिंकवर जाऊन करावी. गो-ग्रीनमध्ये छापील वीज बिलाऐवजी ग्राहकांनी ‘ई- मेल व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत मिळते. ग्राहकांचे वार्षिक १२० रुपये तर महावितरणचा छपाई व इतर खर्च वाचतो.
१२ हजार ग्राहकांची बचत
गो-ग्रीन योजनेतून जळगाव मंडळातील १२ हजार २३९ ग्राहकांनी लाखो रुपयांची वार्षिक बचत सुरू केली आहे. यात जळगाव विभागातील १ हजार ७९६ ग्राहकांची संख्या आहे.लाभ घेण्याचे आवाहन. गो-ग्रीन योजनेचा ग्राहकांनी लाभ घेतल्यास त्यांच्या प्रत्येक वीज बिलात १० रुपयांची बचत होते. तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही जास्तीत- जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.