जळगाव : जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांना नाशिक येथे ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेरुळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराज, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील कलावंत यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
शैक्षणिक, संगणक, सहकार आणि सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिने अभिनेता चिकटगावकर, अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, अचल श्रीनिवासन राव आदी उपस्थित होते. रोहित निकम
मान्यवरांच्या हातून पुरस्कार स्वीकारताना रोहित निकम, यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी भरघोस आर्थिक मदतदेखील केली आहे. आयोध्या राम मंदिरासाठी जळगाव जिल्ह्यातून नेमलेल्या समितीचे रोहित निकम हे उपाध्यक्ष होते.