जळगाव दि.2 (प्रतिनिधी)- जळगावात दि 5 जानेवारी पासुन सुरू होणाऱ्या बालगंधर्व महोत्सवात सोनी टीव्ही वर गाजत असलेल्या इंडिया गॉट टॅलेंट या रियालिटी शो मध्ये रागा फ्युजन बँड आकर्षण ठरणार आहे. शास्त्रीय व उपशास्त्रीय तालवाद्य एकमेकात मिश्रण करून सादर करणारा व अभिजात संगीताला प्राधान्य देणारा या बँडची अनुभूती रसिकांनी घ्यावी.
खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे दि. ५, ६, ७ जानेवारी २०२४ दरम्यान रंगणार आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, होस्टिंग ड्युटी, प्रायोजित हा २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सव आहे.
द्वितीय दिन प्रथम सत्र
पंडिता रोंकिणी गुप्ता (शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन)
वयाच्या ६ व्या वर्षांपासून रोंकिणी गायनाचे धडे गिरवू लागली. तिचे पहिले गुरू पं. चंद्रकांत आपटे होते. त्यानंतर तिचे शिक्षण उस्ताद दिलशाद खान व पं. समरेश चौधरी यांच्याकडे सुरू झाले. त्यानंतरचे शिक्षण उस्ताद अब्दुल रशीद खान यांच्याकडे झाले. सन २००४ साली डोरलेन म्युझिक फेस्टिवल मध्ये भाग घेतला होता. २००४ सालीच सारेगमप वर्ल्ड सिरीजची ती विजेता होती. गेल्या वर्षी भारत सरकारच्या वतीने स्वर कोकिळा पुरस्काराने तिला सन्मानित केले गेले होते. डेक्कन हेरॉल्ड च्या वतीने देशभरातील काही निवडक टॉप म्युझिशियनस मध्ये तिची निवड झाली होती.
रोंकिणी ने आत्तापर्यंत सवाई गंधर्व संगीत महोत्सव, कुंभ समारोह, उदयपूर, पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव, सम्राट फेस्टिवल, गोवा पं. डी. व्ही. पलुस्कर समारोह, पुणे काळा घोडा महोत्सव, पृथ्वी थिऐटर्स मुंबई, एचसीएल कॉन्सर्ट, कैलास फेस्टिवल, चिकमंगळूर, इ. ठिकाणी आपली कला सादर करून रसिकांना रिजवले आहे. आपली आवडती कलाकार म्हणून ऐ.आर. रहमान अनेकदा रोंकिणीच्या नावाचा उच्चार करताना आपल्याला आढळतात. एक अतिशय हरहुन्नरी कलाकार व अभिजात संगीतातील विविध रागांवर तसेच उपशास्त्रीय संगीतातील विविध प्रकारांवर रोंकिणीचे प्रभुत्व असून नव्या पिढीची एक आश्वासक गायिका म्हणून संपूर्ण भारत वर्ष रोंकिणीकडे संपूर्ण देश पाहत आहे. बालगंधर्व संगीत महोत्सवात रोंकिणीला तबल्याची साथ आशिष राघवानी करणार असून संवादिनीची साथ दीपक मराठे करणार आहेत. हे दोन्ही अप्रतिम कलाकार असून त्यांचे रोंकिणीच्या गायनाबरोबर अतिशय उत्तम असे ट्युनिंग आहे. या तीनही कलावंतांना अनुभवण्याचा योग या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकरांना आला आहे.
अशा या प्रतिभासंपन्न युवा गायिकेला ऐकण्याची संधी २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.
द्वितीय दिन द्वितीय सत्र
रागा फ्युजन बँड (शास्त्रीय व उपशास्त्रीय तालवाद्य कचेरी)
सध्या सोनी टीव्ही वर गाजत असलेल्या इंडिया गॉट टॅलेंट या रियालिटी शो मध्ये रागा फ्युजन बँड ने आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. रागा फ्युजन बँड हा एक अतिशय गतिमान अखंडपणे एकमेकात मिश्रण करून सादर करणारा व अभिजात संगीताला प्राधान्य देणारा आणि मोहक सादरीकरण करणारा बँड आहे. ७ कलाकार एकत्रित येऊन ते सादर करीत असलेला सांगितिक अविष्कार म्हणजे रागा फ्युजन बँड. हा एक वेगळीच अनुभूती रसिकांना देऊन जातो. ज्याप्रमाणे सप्तसूर असतात त्याचप्रमाणे हे सप्त कलावंत एकत्रितरित्या हा अविष्कार करतात.
अजय तिवारी (गायन)
अजयचा दैवी भावपूर्ण आवाज म्हणजे या बँडचा आत्मा आहे. त्याचे प्रभाव पूर्वक सादरीकरण, त्याच्या आवाजातील खोली मनाचा ठाव घेणारी असते. त्याचे गायन हे भावनात्मक असते. त्याचा वैविध्यपूर्ण आवाज व आवाजची रेंज ही संपूर्ण ग्रुपला पुढे नेण्यासाठी महत्त्वाची ठरते व ती एक प्रेरक शक्ती असते.
अमृतांशु दत्ता (स्लाईड गिटारिस्ट)
अमृतांशीचे स्लाईड गिटार वादना वर प्रभुत्व तर आहेच पण रागा फ्युजन ला त्याच्या वादनाने एक नवीन परिमाण मिळते. तो सहज कोणतेही क्लिष्ट राग किंवा बंदीशी, रागांची सुरावट आणि त्याबरोबर जाणारे संगीत लिलया फ्युजन मध्ये किंवा सादारीकरणा मध्ये मिश्रित करून त्या सादरीकरणाची उंची वाढवीत असतो, आणि त्यासोबतच तो लयकारी व रागांची मांडणी विणत जातो. त्याच्या वाद्यावर अर्थात स्लाईड गिटार वर ती त्याच्या वादनावर त्याची घट्ट पकड असून त्याचे वादन रसिकांना वेगवेगळ्या ध्वनी लहरींची अनुभूती देतात.
जयंत पटनाईक(तालवादक)
रागा फ्युजन बँड चा ताल म्हणजे तालवादक जयंत पटनाईक आहे. संपूर्ण बँड ला एका ताल सूत्रात बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जयंत करतो. सुमारे ४० वाद्यांवर रागा फ्युजन बँड ला साथ संगत करण्याचा एक महत्त्वपूर्ण गुण जयंत मध्ये आहे. ताला मधील नाविन्य आणि अभिजात संगीतातील तालबद्धता याच्या मिश्रणातून जयंत रसिकांना खिळवून ठेवतो आणि मंत्रमुग्ध करतो.
हर्षित शंकर(बासरी)
हर्षितच्या बासरी वादनाने रसिकांना एक अनोखा सुकून मिळतो. शांतपणे निर्मळ स्वरांची बांधणी करत रागा फ्युजन बँडला हर्षीतच्या बासरी वादनाने एक नवीन उंची गाठता येते, व अभिजात संगीताच्या आधारे संपूर्ण बँड मध्ये पैलू पाडण्याचे काम हर्षित च्या बासरीने होते. बासरी वाजवताना हर्षितची नजाकत आणि वादन हे रसिकांना कल्पनेपलीकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे या बँडचे सादरीकरण मनाला भावते. यांच्यासोबतच प्रितम बोरूआ (बेस गिटारिस्ट) जेरीन जयसन (बेसिस्ट) आणि प्रियश पाठक (ड्रमर) हे पण रागा फ्युजन बँड मध्ये साथसंगत करणार आहेत.
या सातही कलावंतांना तरुण पिढीसह आबालवृद्धांना अनुभवण्याचा योग या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकरांना आला आहे.
अशा या प्रतिभासंपन्न युवा कलावंतांना ऐकण्याची संधी २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.