जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील एका ATM मध्ये पैसे भरणा करण्यासाठी आलेल्या तीन जणांनी तब्ब्ल ६५ लाख रुपये लांबवत पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान आरोपीकडून २० लाख रक्कम पोलिसांनी हस्तगत करण्यात आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहिती अशी की, तीनही संशयित आरोपी नाशिक येथील सिक्यूर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या खासगी कंपनी मार्फत ATM मशीनमध्ये रक्कम भरण्याचं काम करतात. मात्र नेहमी प्रमाणे पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी संगनमत करून त्यांनी तब्बल ६५ लाख रुपये लांबवल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली.
या प्रकरणी आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या तीनही जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.