जळगाव,(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली असून या लोकसभा निवडणुकीत ‘रावेर लोकसभा’ चर्चेत राहणारं असचं दिसत आहेत, त्यासाठी कारणही तसंच आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून सासरे माजी मंत्री एकनाथ आणि सून भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे या आमने सामने राहण्याची चिन्हे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जळगाव जिल्यातील रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केली असून रावेर लोकसभेची जागा NCP राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास एकनाथ खडसे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी स्वतः प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे. रावेर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे खडसेनीं मत व्यक्त केल्यावर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागलं आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीचं सरळ लढत होत असते दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत आहे.याचं मतदार संघातून आता एकनाथ खडसे यांच्या सून खा. रक्षाताई खडसे खासदार आहेत.दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून ही जागा काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.गेल्यावेळेस डॉ. उल्हास पाटील यांनी रावेर लोकसभेतून उमेदवारी केली होती, यावेळेस मात्र काँग्रेस व गांधी परिवाराशी निष्ठावंत असलेले माजी खासदार उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या काँग्रेसकडून निवडणुक लढतील अशी चर्चा आहे.
जर भाजपाने पुन्हा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना संधी दिली आणि रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास एकनाथ खडसेनीं उमेदवारी केल्यास रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वतःच लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडूनही त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना रावेर लोकसभा मतदार संघात पाहायला मिळणार का? हे निवडणुकीत दिसेलच त्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागेल.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रावेर लोकसभा निवडणूकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उतरविल्यास भाजपा कडून भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देऊन खडसेंच्या समोर आव्हान उभं करण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणूक यावेळेस चर्चेत राहणार आहे.
इतर बातम्या….
जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आणि कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक वाचा
आयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त
१ जानेवारी पासून रेशन दुकानदारांचा देशव्यापी संप
धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
पाचव्या मजल्याच्या बाल्कनीतून पती पत्नी खाली पडले,अंगावर शहारे येणारा व्हिडीओ व्हायरल
आधी कडेवर घेतलं, नंतर चुंबन घेतले ; विद्यार्थी आणि शिक्षिकेचे रोमॅंटिक फोटोसेशन व्हायरल
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा