महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र झटणारं,राज्यभरातील पत्रकारांच्या सुखा दुःखात सहभागी होऊन मदतीचा हात पुढं करणारं एक असं नावं की ज्याच्या नावातचं ‘विश्वास’ आहे ते म्हणजेच डॉ. विश्वासराव आरोटे होय… पत्रकारांचा आधारस्तंभ असलेले डॉ. विश्वासराव आरोटे यांचा आज १ जानेवारी रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांना ‘नजरकैद’ वृत्तसमूहाकडून खूप खूप शुभेच्छा..!
आज पत्रकारांसाठी नेतृत्व करणाऱ्या अनेक संघटना आहेत. पण त्यातच प्रामाणिक आणि सचोटीने नेतृत्व करणारे फार कमी आहेत. त्याचबरोबर नेतृत्व करणारे पत्रकारांच्या खऱ्या प्रश्नाकडे पाठ फिरवून नेतृत्व करण्याचा देखावा करतात असंच दिसून येतं मात्र हे चित्र बदलंय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे राज्य सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पडताना गाव खेड्या पासून शहरातील वार्ताहर, पत्रकारांचे प्रश्न समजून त्यास खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम डॉ. विश्वासराव आरोटे करत असल्यानेच अख्या महाराष्ट्रात त्यांना पत्रकार आदराने ‘माऊली’ मानते.
उपक्रमशील व्यक्तिमत्व…
समाजात पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना समाजाची आपल्यावर खूप मोठी जबादारी असून पत्रकारिते सोबत समाजचं देणं लागतं ही भावना संघटनेच्या प्रत्येक पत्रकारामध्ये रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे आणि म्हणूनचं ते नेहमीच म्हणतात की,सुरुवात ही नेहमी स्वतःपासून असावी. आपण एकदा का सत्कार्याला सुरुवात केली तर अनेक लोक साथ देऊन बदल घडवून आणायला सहाय्य करतात. समाज विकासाची भावना असल्यानेच पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप, पत्रकारांना हेल्मेट वाटप, विमा कवच, पत्रकारांच्या सुख दुःखात आर्थिक मदत करण्याचे कार्य करण्यास ते नेहमीच तत्पर दिसून येतात त्यांच्या या उत्तम कार्यानेच त्यांचे उपक्रमशील व्यक्तिमत्व दिसून येतं.
सेवा,समर्पण…
आपल्या हातून सत्कार्य घडावे, सेवा घडावी आणि चांगले कार्य केल्याचे समाधान मिळावे, असे डॉ. विश्वासराव आरोटे यांना वाटत असल्यानेच ते पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ पत्रकार संघटनेसाठी देत समर्पण भावनेने त्यांचे कार्य सुरु त्यांचे कार्य राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे.
कोविडच्या संकटातील देवदूत
सर्वत्र कोरोनाचं संकट असतांना पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावत पत्रकांरासाठी कोविडच्या संकटातील देवदूत बनताना आपण त्यांना पाहिलं आहेत. कोविडच्या संकटात प्रत्येकाला ज्याचं त्याच पडलेलं असताना पत्रकार बांधवाना ”मोफत रुग्ण सेवा”, औषधी, वैद्यकीय सेवा,गरजेच्या ठिकाणी किराणा किट ची मदत मोठ्या प्रमाणात उभी करून एक आदर्श आपण सर्वांना घालून दिला आहे.यामुळेच आपल्या सारख्या निस्वार्थी नेतृत्वावर पत्रकारांचा विश्वास दृढ झाला आहे.
पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याच्या संकल्पास सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वराने आपणास उत्तम आरोग्य प्रदान करावे. आपणास तमाम पत्रकार बांधवांच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा !!
प्रविण सपकाळे
संपादक – दैनिक नजरकैद, जळगाव
अध्यक्ष – उत्तर महाराष्ट्र विभाग
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ