पाचोरा (प्रतिनिधी):-पाचोरा-भडगाव मतदार संघातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेवरील श्रद्धा आणि गलिच्छ राजकारणापासून दूर असलेले कावेबाजपणा नसलेले, नीतिमत्ता, एकनिष्ठता, सत्यवादी, प्रामाणिक व पुरोगामी महाराष्ट्राचे रक्षण करणारे एकमेव नेते असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे महाराष्ट्र प्रेम व संस्कार गुणांनी प्रेरित होऊन पाचोरा-भडगाव तालुक्यातील असंख्य लोकांनी शिवसेना उबाठा पक्षाचा झेंडा हाती घेतला.
मार्गदर्शन करतांना मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे म्हणाले की आर.ओ.तात्या हा माणुस खंदा कार्यकर्ते होते. त्यांचं जाणं हे सगळ्यांसाठीच आघात होता. आघाताला न घाबरता सौ. वैशालीताईंनी त्यांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्व:ताला झोकुन दिलं त्यामुळे ताईंचं कौतुकच वाटतं. सत्तेला घाबरुन चालणार नाही. सत्तेची भिती वाटत असेल तर तिला उलथवलेच पाहिजे त्यासाठीच मी उभा आहे. या कामात आपण सर्वजन सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे स्वागत करुन हे वर्ष आनंदाचे व लोकशाहीचे जावोत अशा शुभेच्छा उध्दव साहेबांनी दिल्यात.
श्री संजय राऊत बोलताना म्हणाले की, आमच्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही पण उध्दवसाहेब आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी जिद्दीने काम करुन जिंकु या असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौ. वैशालीताई बोलतांना म्हणाल्या की मागील दीड वर्षापासुन मी सतत फिरत आहे. उध्दवसाहेबांवर निष्ठा आणि त्यात्यासाहेबांवरील प्रेमापोटी हा गोतावळा जमला. अल्पावधीतच तो यापेक्षाही जास्त होईल असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मातोश्रीवर श्री. संजयजी राऊत, श्री. अरविंद सावंत, श्री. संजयजी सावंत, सौ. शुभांगी ताई पाटील इ. मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पाचोरा-भडगाव शिवसेना (उबाठा) पदाधिकारी – दिपकसिंग राजपुत, उध्दव मराठे, अरुण पाटील, नरेद्रसिंग सुर्यवंशी, शरद पाटील, मनोहर चौधरी, विलास पाटील, जे.के.पाटील इत्यादीं सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नीतिमत्ता गहाण ठेवून खोट्या निष्ठेची पांघरूने घालत, सत्याला दडपून राजकारणात खोट्या निष्ठेचा नवा बाजार सुरू झाला. मंदिरात देवाची शपथ घेवूनही स्वार्थासाठी निष्ठा कशा विकल्या जातात. आज देशात, महाराष्ट्रात सगळीकडेच अतिशय घाणेरडे राजकारण सुरू आहे. नैतिकता हरपली आहे, केवळ पैशासाठी श्रद्धांचा, निष्ठांचा लिलाव होताना दिसत आहे. सत्याला दडपण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर सऱ्हासपणे सुरू आहे. विकासाच्या नावाखाली केवळ आपल्याच कार्यकर्त्यांचे खिसे भरून त्यांना कामाचे ठेके देवून, त्यांना मोठे करून जनतेच्या पैशाची लूटमार सुरू असल्याचे सौ. वैशालीताई यांनी म्हटले आहे.
क्षेत्र कुठलेही असो पण तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांची निष्ठा विकाऊ नव्हती, ती जातीवंत होती. भ्रष्टाचाराला त्यांनी थारा दिला नाही. त्यांनी सत्व आणि तत्व सोडले नाही. सत्याच्या मार्गाने ते चालणारे होते. अधिकाऱ्यांवर कधी दडपण आणले नाही. जनतेच्या पैशाची वाटमारी केली नाही. एकंदरीतच तात्यांची निष्ठा, त्यांचे आचार-विचार, तत्त्व आणि सत्व, नैतिकता, सत्यशीलता ही बावनकशी सोन्यासारखीच होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची कन्या वैशालीताई सूर्यवंशी वडिलांच्या समृद्ध विचारांच्या पाठबळावर जनतेच्या विकासाचा वसा घेत त्यांनी वाटचाल सुरू केली. ताईंची निष्ठा, सत्याच्या मार्गावरची त्यांची वाटचाल, प्रामाणिक व विकासगामी दमदार महिला नेतृत्व आणि नवनिर्माणाची प्रचंड ताकद बघून मतदारसंघातील विविध पक्षातील असंख्य प्रामाणिक आणि निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर ठामपणे विश्वास ठेवत आज शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.
मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केलेली ही सर्व मंडळी सत्ताधारी पक्षातील शिवसेना (शिंदे गट), भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रस पक्षातील असुन त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, शेतकरी संघटना, मार्केट कमेटी, नपा, शेतकी संघ, वकील संघ, मच्छीमार संघटना, सोसायट्या, ग्रामपंचायत अशा विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत.
प्रवेश कर्त्यांचे आर.ओ. तात्यांशी असलेले ऋणानुबंध, त्यांचे शुध्द आचार-विचार, निती, तात्यांची एकनिष्ठ व सत्यवादी भुमिका याची सर्वांना जाण असल्यामुळे या सर्वांनी सौ. वैशालीताईंच्या सक्षम, व्हिजनरी व दमदार महिला नेतृत्वावर पसंती दर्शवत शिवसेना उबाठा गटात भव्य प्रवेश केला.
पक्षप्रवेश केलेल्यांची नावे अशी…
श्री. विकास वाघ- पाचोरा (युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महा. व युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष), श्री. जयसिंग कारभारी परदेशी-सावखेडा (मा.सभापती मार्केट कमेटी व मा.चेअरमन शेतकी संघ) भाजपा, श्री. बालू आण्णा-पिंप्री (मा.सभापती मार्केट कमेटी) भाजपा, श्री. रविंद्र पोपट पाटील-बांबरुड (मा.सभापती पंचायत समिती-पाचोरा) भाजपा, श्री. विसपुते आण्णा-वरखेडी (मा.सचिव-मार्केट कमेटी) सामाजिक कार्यकर्ते, श्री. चंदुशेठ रेणुमल केसवाणी-पाचोरा (माजी उपनगराध्यक्ष-पाचोरा न.पा.) राष्ट्रवादी, श्री. व्यंकटराव पाटील-भोरटेक (माजी सरपंच) भाजपा, श्री. उखा पाटील-नेरी (भाजपा), श्री. राजु काळे-पाचोरा (सामाजिक कार्यकर्ते), सादिक पठाण-पाचोरा (सामाजिक कार्यकर्ते), श्री. जितेंद्र भिमराव पाटील-भोरटेक (भाजपा), श्री. विजय पाटील-राजीव गांधी कॉलनी पाचोरा (शिंदे गट), श्री. राकेश सोनवणे-पाचोरा (राष्ट्रवादी), श्री. राजेंद्र जुलाल पाटील-सार्वे (भाजपा), श्री. काशिनाथ दामू पाटील-वडगाव हडसन (विकासो सदस्य, आदर्श शेतकरी) राष्ट्रवादी, श्री. प्रमोद नाना-पुनगाव (माजी सरपंच) राष्ट्रवादी, व्दारकाबाई सोनवणे-पाचोरा (माजी नगरसेविका) राष्ट्रवादी, सौ. आश्विनी काळे-पाचोरा (सामाजिक कार्यकर्त्या), श्री. जिजाबराव जनार्दन पाटील-पिंप्री (मा. ग्रामपंचयत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष) भाजपा, श्री. अमोल रामराव चव्हाण-पिंप्री (भाजपा गटप्रमुख), श्री. जावेद खान-पाचोरा (सामाजिक कार्यकर्ते) श्री. संतोष पाटील- आंबेवडगाव (सामाजिक कार्यकर्ते), श्री. मिलींद भुसारे-आंबेवडगाव (सामाजिक कार्यकर्ते), श्री. विनोद पाटील-सार्वे (सामाजिक कार्यकर्ते), श्री. हरिभाऊ तुकाराम पाटील-पाचोरा-कार्यकर्ता, सौ. योजनाताई पाटील-भडगाव (जिल्हा उपाध्यक्ष- महिला आघाडी राष्ट्रवादी, संचालिका-शेतकरी सहकारी संघ व माजी नगरसेविका) राष्ट्रवादी, श्री. पप्पू दादा-वडजी (मा. सभापती पंचायत समिती-भडगाव) शिंदे गट, सौ. सुषमाताई भावसार-भडगाव (भाजपा जिल्हा सरचिटणीस) भाजपा, श्रीमती रिना पाटील-भडगाव (महिला बचत गट-शिआरएफ) सामाजिक कार्यकर्त्या, श्री. वासुदेव राजाराम पाटील-घुसर्डी (माजी सरपंच) राष्ट्रवादी, श्री. विजय साळुंखे-गोंडगाव (वंदेमातरम प्रतिष्ठान गोंडगाव) शिंदे गट, श्री. गोकुळ अशोक पाटील-पांढरद (माजी सरपंच) शिंदे गट, श्री. तुषार साहेबराव पाटील-पांढरद (सरपंच) शिंदे गट, श्री. प्रकाश सुकदेव महाजन-भडगाव (माळी समाज अध्यक्ष-भडगाव) सामाजिक कार्यकर्ता, श्री. उत्तम शामराव पाटील-महिंदळे (विकासो-चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य) शिंदे गट, श्री. अशोक बाबुलाल पाटील-महिंदळे (विकासो व्हा. चेअरमन) शिंदे गट, श्री. कल्याण दयाराम पाटील-पिंप्रीहाट (विकासो-चेअरमन) राष्ट्रवादी, सौ. सविता महिंद्र चौधरी-भडगाव (सामाजिक कार्यकर्त्या), सौ. रेखा हिरामन सोनवणे-भडगाव (सामाजिक कार्यकर्त्या), श्री. प्रदिप जयवंत पाटील-अंतुर्ली बुवाची (राष्ट्रवादी), श्री. भगवान धनसिंग पाटील-महिंदळे (शिंदे गट), श्री. शरद बाबुलाल पाटील- महिंदळे (शिंदे गट), श्री. सुनिल जगन्नाथ पाटील-महिंदळे (शिंदे गट), श्री. विकास बाबुलाल पाटील-कनाशी (भाजपा), श्री. ईश्वर पतिंग मोरे-कनाशी (शिंदे गट), श्री. गोविंदा दगा पाटील-पांढरद (शिंदे गट), श्री. साहेबराव शंकर पाटील-निंभोरा (शिंदे गट), श्री. रविंद्र अभिमन पाटील-निंभोरा (शिंदे गट), श्री. शाम शिवराम पाटील-कनाशी (शिंदे गट), श्री. दत्तात्रय श्रावण मांडोळे-गोंडगाव (संभाजी बिग्रेड), श्री. सुभाष लखीचंद परदेशी-वडजी (शिंदे गट), श्री. विकास लाला पाटील-वडजी (शिंदे गट), श्री. जितेंद्र धुडकु पाटील-पासर्डी (राष्ट्रवादी), श्री. सुभाष बलराम पाटील-पिंप्रीहाट (विकासो व्हा. चेअरमन) शिंदे गट, श्री. दिपक सुरेश मोरे-पिंप्रीहाट (सरपंच-ग्रामपंचायत) शिंदे गट, श्री. शांताराम रघुनाथ पाटील-पिंप्रीहाट (उपसरपंच-ग्रामपंचायत) शिंदे गट, श्री. रविंद्र धोंडू पाटील-पिंप्रीहाट (ग्रामपंचायत सदस्य) शिंदे गट, श्री. विजय चिंधा पाटील, पिंप्रीहाट (ग्रामपंचयात सदस्य) शिंदे गट, श्री. गोपिचंद सुकदेव पाटील-पिंप्रीहाट (मा.सरपंच) शिंदे गट, श्री. कन्हैयासिंग परदेशी -नगरदेवळा (राष्ट्रवादी), श्री. नामदेव वना महाजन-नगरदेवळा (भाजपा-विभाग प्रमुख), श्री. ज्ञानेश्वर महादु महाजन-नगरदेवळा (व्यापारी) सामाजिक कार्यकर्ता, श्री. रोहिदास पाटील-नगरदेवळा (मा.उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य) शिंदे गट, जमील शेख-नगरदेवळा (व्यापारी), श्री. मयुर दिनेश मनियार-नगरदेवळा (शेतकरी संघटना-अध्यक्ष), श्री. शुभम ज्ञानेश्वर पाटील-नगरदेवळा (शिंदे गट शहरप्रमुख) शिंदे गट, श्री. सिताराम नथ्थू बागूल-नगरदेवळा (मा. ग्रामपंचयात सदस्य) शिंदे गट, श्री. दिपक पाटील सर-नगरदेवळा (आरएसएस), श्री. सुकदेव बाबुलाल निकम-नगरदेवळा (संचालक शिक्षण संस्था-नगरदेवळा) शिंदे गट, श्री. बारकु भोई-नगरदेवळा (संचालक मच्छीमार सो. नगरदेवळा) व्यापारी, श्री. प्रकाश काटकार-नगरदेवळा (भाजपा), श्री. गोरख अर्जुन भोई-नगरदेवळा (चेअरमन-मच्छीमार सो.नगरदेवळा), श्री. दिलीप अशोक राऊत-नगरदेवळा (भाजपा), श्री. शरद उत्तम महाले-नगरदेवळा (शिंदे गट) श्री. सुनिल बाबुलाल शेलार- टाकळी (शिंदे गट), श्री. शिवाजी प्रताप पाटील-वडगाव (शिंदे गट), श्री. राकेश देविदास महाजन-नगरदेवळा (शिंदे गट), श्री. गुलाब महाजन-नगरदेवळा इत्यादींनी प्रवेश केला.
थेट मातोश्रीवर जावुन केलेल्या या भव्य पक्षप्रवेशामुळे पाचोरा-भडगाव तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळुन निघाले असुन सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांना मोठे बळ प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.