अयोध्या : येथील राम मंदिराच्या तळमजल्यावरील काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता मंदिरात दरवाजे बसवण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावर लावण्यात येणारे १४ दरवाजे हैदराबादच्या अनुराधा टिंबर्स इंटरनॅशनलचे संचालक सरथ बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातून आणलेल्या सागवानाच्या लाकडापासून बनवले जात आहेत.
या दरवाजांवर तांब्याची परत लावण्यात आली असून, त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. कन्याकुमारी येथील कारागीर गेल्या तीन महिन्यांपासून या कामात गुंतले आहेत. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजाची उंची ८ फूट असून, दरवाजाची रुंदी १२ फूट आहे. दरवाजावर अंतिम हात फिरविण्यासाठी ते दिल्लीला पाठवण्यात आले आहेत. या दरवाजावर भव्यतेचे प्रतीक हत्ती, विष्णू कमळ, स्वागताच्या मुदेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत.
दरवाजावर मोर, कमळ अन्द रवाजे नागर शैलीत डिझाइन केलेले आहेत, यात कमळ, मोर आणि इतर पक्ष्याचे पारपरिक भारतीय आकृतिबंध प्रदर्शित केले आहेत नागर मंदिर स्थापत्यरोली ही उत्तर भारतीय पारंपरिक शैली असून, तिचा उगम इसवी सनाच्या सियासत काळात झाला आणि मुस्लिमाच्या आगमनापर्यंत ही राहिली असे मागिले नानीने साले की आतापर्यंत मुख्य मंदिरावे २४ दाते आणि मंदिराभोवती ५०० फ्रेम बनवण्यात आल्या आहेत
भारतातील नागर शैलीवर बांधले जात आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना चार वेगवेगळे दरवाजे बनवण्यात आले आहेत. सर्व दरवाजांवर भारतीय संस्कृतीची झलकही पाहायला मिळणार आहे. मंदिरात प्रदर्शन, ध्यानमंदिर, धर्मशाळा, संशोधन केंद्र, कर्मचा- यासाठी निवासस्थान, प्रभू रामावरील संशोधन आणि साहित्य वाचण्यासाठी ग्रंथालयही उभारण्यात येणार आहे