यष्टिरक्षक-फलंदाज पंत ऋषभ याच्यासह पंचतारांकित हॉटेल्स व अन्य काही लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा हरयाणाचा १९ वर्षांखालील क्रिकेटपटू मृणांक सिंग याला पोलिसांनी अटक केली. मृणांकने आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत अनेक हॉटेल्सची फसवणूक केली. तो एका आयपीएल फ्रँचायझीचा खेळाडू आहे.
हॉटेलचीही केली ५.५३ लाखांची फसवणूक
मृणांक हा क्रिकेटर असल्याचे सांगून २२ ते २९ जुलै २०२२ या कालावधीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. ५.५३ लाखांचे बिल न देता तो हॉटेलमधून पळून गेला होता. हॉटेलच्या अधिकाऱ्याने त्याला बिल भरण्यास सांगितले, तेव्हा त्याने माझे बिल प्रायोजक कंपनी देईल. यानंतर हॉटेलने त्याला बैंक डिटेल्स दिले, पण आरोपीने हॉटेलमध्ये पाठवलेल्या दोन लाख रुपयांच्या ऑनलाइन व्यवहाराचा क्रमांक बनावट निघाला.