मुंबई,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सरकारने नव्या महिला धोरणाला मंजुरी दिली असून या धोरणातील नव्या बदलामुळे प्रत्येकाच्या नाव लिहण्यात मोठा बदल होणार आहेत आणि तसं करणं बंधनकारक असणार आहे.आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकारक होते पण आता या महिला धोरणाला मंजुरी मिळाल्यामुळे जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे झाले आहे, नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असल्याने आता नावं लिहतांना हा मोठा बदल करावा लागणार आहे.
असं लिहावं लागेल यापुढे नावं
राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडल्या नंतर या धोरणाला मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री दादा भुसे यांनी देखील या महिला धोरणात काही सूचना व दुरुस्त्या सूचवल्या होत्या त्या नुसार सुधारित धोरण मंत्री आदिती तटकरे यांनी मांडले होते. दरम्यान त्या स्वतः नेहमीच वडिलांच्या आधी आईचे नाव लावत असतात.मंत्रालयातील त्यांच्या दालनाची पाटी सुद्धा अशाचं पद्धतीची दिसून येते. मंत्रालयातील त्यांच्या दालनाच्या बाहेर असलेल्या पाटीवर ‘आदिती वरदा सुनील तटकरे’ असं नावं आहे. आता राज्यात या धोरणानंतर असेच नाव प्रत्येकाला लिहावे लागणार आहे.
या महिला धोरणात अजूनही बरंच काही
या महिला धोरणात उद्योगात ३० टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचे लाभ, सर्व रस्त्यांवर २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.महिलांसाठी मालमत्ताविषयक सवलती, घरून काम करण्याचा पर्याय तसेच मातृत्व आणि पितृत्व रजेची सवलत मिळण्यावरही भर देण्यात आला आहे.
इतर बातम्या….
पुढील वर्षांपासून एका नवीन विषयाचा समावेश ; पहिलीपासून असणार अभ्यासक्रम!
शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर
Lic credit card; एलआयसी क्रेडिट कार्ड वर ५ लाख विमा संरक्षणासह अनेक फायदे
साई दर्शनासाठी आलेल्या बहीण-भावंडांची शिर्डीत लॉजवर आत्महत्या
हे तुम्हाला माहीत आहेत का?, तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत तरीही काढू शकता १० हजार रुपयांपर्यंत रक्कम!
curative petition ; क्युरेटिव्ह पिटीशन ही शेवटची संधी ! मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केली म्हणजे काय जाणून घ्या…