जळगाव दि. 23 (प्रतिनिधी)- जागरण समूहाच्या रेडिओ सिटी 91.1 एफ एम च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
फोटो कॅप्शन – जागरण समूहाच्या रेडिओ सिटी 91.1 एफ एम तर्फे अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशचा ‘महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड’ वतीने स्वीकारताना अनिल जोशी.
पुणे येथील अमनोरा पर्ण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर व अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते विविध व्यक्ती, संस्थांचा सन्मान करण्यात आला. यात स्नेहाची शिदोरी हा उपक्रम अविरत सुरू असल्याबद्दल जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था असलेल्या भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन ला गौरविण्यात आले. फौंडेशनच्यवतीने जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे सहकारी अनिल जोशी यांनी हा पुरस्कार अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते स्वीकारला.
मार्च 20 पासून स्नेहाची शिदोरी सुरू करण्यात आली आहे. जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी शहरात कोणीही उपाशी राहू नये या उदात्त भावनेने ही शिदोरी अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 24 लाखाहून अधिक शिदोरी वाटप करण्यात आली आहे.